सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ – शाहू महाराज
शैक्षणिक, सांस्कृतिक, अर्थिक सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिन २६ जुन हा दिवस सामाजिक न्याय दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. राजर्षी शाहू महाराज यांचा २ एप्रिल १८९४ रोजी राज्याभिषेक झाला. व छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे वयाच्या २० व्या वर्षी कोल्हापूर संस्थानाचे राजे झाले. दिनदुबळ्या समाजाचे लोकराजा झाले.
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांचे शिक्षण राजकोट व धारवाड येथे झाले.सर फ्रेझर व रघुनाथराव सबनीस यांसारखे त्यांना मार्गदर्शक मिळाले.त्यांनी समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी अधिक भर दिला आहे.त्यासाठी त्यांनी कोल्हापुर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे व मोफत देण्याची मागणी केली. व समाजातील प्रत्येक घटकाला शिक्षण मिळावे.यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात प्रसार केला. त्यांनी शैक्षणिक कार्यास प्रोत्साहन देण्यासाठी अनेक शैक्षणिक कार्यक्रम सुरू केले.विविध जाती ध...