समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुले
समाजाचे दीपस्तंभ महात्मा ज्योतिबा फुलेमहात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात झाला त्यावेळी तत्कालीन ब्रिटिश राजवटीचा काळ होता. ब्रिटिश भारतात येण्याआधी पेशवाई राजवट होती.पेशवाई राजवट म्हणजे समाजातील लोकांच्या सर्वांगीण विकासाचा पाया पूर्णपणे मोडून त्यांना गुलाम बनविणे. मानवाचे हनन करणारा असा हा कर्दनकाळ होता.. वैदिक संस्कृतीचा पगडा असलेला तो काळ रूढी, परंपरा, वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, धर्मवाद, कर्मकांड, याने ग्रासलेला होता. चुकीच्या परपरंना बळी पाडून, दैववादाच्या नावावर पाप- पुण्य, स्वर्ग, नरकाची भीती दाखवून सामान्य लोकांना गुलाम बनविल्या जायचे.माणूस म्हणून जगण्याचे अधिकार त्यांच्याकडून हिरावून घेतल्या गेले.. ईश्वरी थोतांड रचून देवाच्या नावावरच अन्याय अत्याचार केले जायचे.. प्रचंड अज्ञान समाजात असल्यामुळे आपण माणूस आहे.. याचा लोकांना विसर पडला. त्यांच्या व...

