नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रह
नभाला भिडावे निळ्या पाखरांनी – अरुण विघ्ने यांचा गझल संग्रहअरुण विघ्ने सर संवेदनशील,आंबेडकर आणि गौतम बुध्द यांच्या विचारचा जबरदस्त पगडा असणारा व त्यांच्या विचाराचा सुगंध,परिमळ सर्वदूर आपल्या गझलेतून,कवितेतून फैलवणारा निर्मळ मनाचा साहित्यिक. 'नभाला भिडावे निळ्या पाखरांनी' अशी कळकळीची आस असणारा गझलकार, समीक्षक,स्फुट लेखक,व्यक्तीविशेष असा चौफेर लेखन करुन आपल्या वेगळ्या लेखन शैलीचा ठसा उमटविणारा साहित्यिक मित्र.निळ्या पाखरांनी नभाला गवसणी घालत नवे गीत गावे. नव्याचा स्विकार करत असतांना प्रसंगी उपाशी राहून समजदार होत स्वकमाई करुन आपल्या कमाईचा हिस्सा आपल्या बांधवांच्या उन्नतीसाठी खर्च करावा.स्वाभिमानाने भीमाच्या विचार रथाचे सारथ्य करावे ,आपल्या लेखनीच्या द्वारे जनाचा उद्धार करावा.कारण भीमाचे उपकार आपण कदापी विसरू नये.स्वतः लोकसेवक होऊन बुध्द वचनास जागवावे.हा विचार. रुजवता...
