Thursday, November 13

Tag: #सटवाई #आबासाहेबकडू #मराठीकविता #शेतकऱ्याचीकविता #कृषीकविता #मराठीपोएट्री #FarmerPoem #MarathiPoem #GauravPrakashan

सटवाई.!
Poem

सटवाई.!

सटवाई.!तू करत जाय मरमर,गायत जाय घामगुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।पायटीच उठूनसन्या करतं झोपीचं खोबरंनशीबात हरदमच हाये तुया वखरंसूर्यदेव ओकते आग तरी काढतं तू काकरंडोयामंधी घिवूनसन्या बायको अन लेकरं….राबराब राबून राज्या कितीक करशीन काम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।सोयाबुन पेर,तूर पेर, नाईतं पेर सरकीकव्हातरी पडते काय तुया हाती दिडकी?बजारात जाताखेपी दलाल तूले हेरतेतभाव कसा पाडता यिन याचाच ईचार करतेदाम तुया हिस्याचे थेच घिवून पयतेतभोयाभाया सभाव तुया तू करतं राम राम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।मार्केटात माल तुया उघळ्यावर रायतेफिकर तुया मालाची कोन कव्हा करते?अन्न-धान्य पिकवासाठी कसतं तू कंबरफ्यासीलिटीत मातरं तुयाच ढांग नंबरउपाशी मरतं तव्हाच दिसंन तेयले धाम।।गुठली तुया हिस्याले,भलतेच खाते आम।।...