संवाद हरवलेला आहे!
आज आपल्याला दिसतंय की सर्वच लोकं मोबाईलवर व्यस्त दिसतात. घरादारात हीच परिस्थिती आहे व लोकांचा घरादारातील हा व्यवहार पाहून असं वाटायला लागलं आहे की आज संवाद घराघरातून हरवत चालला की काय? यावर बरेच लोकं चिंताही व्यक्त करीत आहेत व वर्तमानपत्रातून त्यास्वरुपाच्या बातम्याही छापून येत आहेत. संवाद...... संवाद हरवला आहे. तो घरातून कुठे निघून गेला ते कळत नाही. शेजारी जावून बसला असेल असं वाटल्यानं तिथंही दिसला नाही. वस्तीत शोधलं संवादाला. तिथंही सापडला नाही. मग गेलो गावात. तिथंही नव्हताच. त्यानंतर तालुक्यात, शहरात, राज्यात, देशात व जगात संवादाला शोधलं. तरीही संवाद आढळलेलाच नाही. मग टिव्हीवर एक बातमी रुपानं त्याचा एक अवयव दिसला. व्हाट्सअपवर एक अवयव दिसला. फेसबुकवर व इंन्ट्राग्रामवर एक अवयव दिसला. यु ट्यूबवर एक अवयव दिसला. तेव्हा जाणवलं की...
