Osteoarthritis : संधिवात
Osteoarthritis : संधिवात बदललेली जीवनशैली यामुळे आजकाल संधिवाताचा त्रास हा अनेकजणांना आहे. संधिवातमध्ये सांध्यांच्या ठिकाणी सूज व अतिशय वेदना होत असते. त्यामुळेच या त्रासाला सांधेदुखी असेही म्हणतात. सांधेदुखी कशामुळे होते, त्याची लक्षणे आणि संधिवात वरील उपचार याची माहिती डॉ सतीश उपळकर यांनी या लेखात सांगितली आहे.दोन हाडे एकत्र येऊन सांधे किंवा joints बनत असते. सांध्यांची हालचाल होताना तेथे असलेली दोन हाडे एकमेकांना घासू नयेत यासाठी तेथे कार्टीलेज नावाचा घटक असतो. या कार्टीलेजमुळे हाडे एकमेकांना न घासता सहजरीत्या सांध्याची हालचाल होत असते. मात्र जेंव्हा काही कारणांनी सांध्यातील कार्टीलेजची झीज होते तेंव्हा दोन्ही हाडे एकमेकांना घासू लागतात. अशावेळी तेथे सूज येणे, वेदना होणे, सांध्याची हालचाल योग्यरीत्या न होणे असे त्रास होऊ लागतात. या त्रासाला संधिवात असे म्हणतात.तसे पाहिले तर, संधिवा...
