शेराचे झाड
शेराचे झाडEuphorbia tirucalli.
अत्यंत दुर्लक्षित झालेले झाड!
पूर्वी शेतबांधावर आपले पुर्वज आवर्जून हे झाड लावायचे,किंवा अख्ख्या शेताला ह्याचे कुंपण असायचे. कारण पिकांवर पडणारे अनेक रोग हे झाड अडवून धरायचे!तसं बघीतले तर अत्यंत जहाल झाड, पण विनाकारण डिवचले तर!
आमचे अख्खे बालपण शेराखाली खेळण्यात गेले, आमची आई फक्त शेराच्या झाडाला हात लावू देत नव्हती. याचा चिक डोळ्यात वगैरे गेला तर अत्यंत घातक म्हणून. पण शेराची सावली अत्यंत आरोग्यदायी असते हे आता कळतंय, कारण शेर नामशेष होऊ लागलेत.
शेराचे झाड पिकावरील किडींचा प्रादुर्भाव रोखते हे वाचून मी ह्यावर्षी आमच्या मक्यावर एक प्रयोग केला. मक्यावर पडणाऱ्या लष्करी आळीसाठी मी शेराच्या पाचसहा नांग्या खलबत्त्यात चेचून दोन दिवस एक लिटर पाण्यात भिजत ठेवल्या आणि तिसऱ्या दिवशी दोनशे मिली पंधरा लिटर पाण्यातून फवारल्या!रिझल्ट म्हणाल तर मी दुकानातून आणलेले औषध परत...
