शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
शेतकऱ्यांचे कैवारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे देशाच्या तसेच जगाच्या इतिहासात अद्वितीय व अजरामर असे स्थान आहे. मानवी जीवनाच्या अनंत पैलूचे त्यांनी निरीक्षण केले आहे. त्याच्या कार्यकर्तृत्वाने अनेकांचे प्रेरणास्थान बनले आहे.शिक्षणाचे प्रेरणास्तंभ,भारतीय संविधानाचे शिल्पकार, ज्ञानपुरुष ,निस्सीम ग्रंथप्रेमी,विचार स्वातंत्र्याचे खरे समर्थक,थोर समाज सुधारक,प्राख्यत अर्थतज्ञ, आंतरराष्ट्रीय संबंधाचे माहितगार,ऊर्जा व ज्ल संसाधनाचे नियोजक, अंधश्रद्धाचे कर्दनकाळ, सद्भावना सांप्रदायिक व सहिष्णुता प्रेरक, महिलाच्या समान हक्कासाठी संघर्षरत, शेतकरी/शेतमजूर व कामगाराच्या न्याय अधिकाराचे लढवय्ये,शांतता व अहिंसेचे समर्थक, बहुजन समाजाचे उद्धारक प्रज्ञासूर्य परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्यकर्तृत्वाचे व व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहे.गरीब वंचित,शोषित,पीडित, महिला, कामगार आणि सर...
