Sunday, October 26

Tag: #शेतकरी

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !
News

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या आहे तगादा लावून !

शेतकऱ्यांची शेती गेली वाहून, सरकार गेलं झोपून ! बँका मात्र उठल्या तगादा आहे सुरू!औरंगाबाद : मराठवाड्याच्या मातीने पुन्हा एकदा रक्त गाळलं आहे… पण सरकारकडे अजूनही झोपेचे डोळे आहेत. घरदार, शेती, संसार सगळं वाहून गेलं; पण ‘मदत’ मात्र अद्याप कागदावरच. अतिवृष्टीने हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला, पण बँकांचे नोटीस पाठवणारे फोन अजूनही थांबलेले नाहीत.“घरदार गेलं, शिवार गेलं… पण बँका आमच्या जिवाला लागल्या!” हा मराठवाड्यातील प्रत्येक शेतकऱ्याचा आक्रोश आहे. शिवार हेल्पलाईनवर आलेले ५४४६ फोन सांगतात की, ही केवळ आपत्ती नाही, तर ‘मानसिक दुष्काळ’ आहे. सरकारचे आश्वासन ओघळलेल्या पावसासारखे आणि बँकांचा तगादा वीज कोसळावी तसे सुरू आहे.अजूनही १७०० शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. हातात काहीच नाही, अंगावर कपडे तेवढे शिल्लक. “साहेब, थोडा आधार द्या, नाहीतर आम्ही नकोच जगायला…” या विनवणीतही ...
कोजागिरी.!
Poem

कोजागिरी.!

कोजागिरीकोजागिरीच्या दुधानंअशी शक्ती द्यावीआम्ही धष्टपुष्ट व्हावेआमची बेरोजगारी जावीनोकरी नाही मिळाली तरीआम्ही कमजोर नसावेकोणतेही कामधंदेआम्ही स्वखुशीनं करावेदारिद्र्यातील बापालाहीअर्थ प्राप्त व्हावाआईचं धूरपाटनजरेसमोर चालता व्हावायावे सुखमय दिवसअनंत काळासाठीशेतकरीही आमचा दाताराहावा कधी न उपाशीआमची बहिण अंचलासुरक्षीत व्हावीकोणी कलीने केव्हाहीकधी अब्रू न लुटावीचंद्राची चांदणीहीसुखमय व्हावीहुंड्यासाठी चांदणीकधी न जळावीते दिवस परतीचेआधार व्हावा मुलांचावृद्धाश्रमात पित्यांचाकधी अंत न व्हावाऐसेच दिन यावेरामराज्य दिसावेअनाथ अपंगांचेकधी स्वप्न न तुटावेअंकुश शिंगाडेनागपूर ९३७३४५९४५०हे वाचा-गणेश उत्सवाचे बदललेले स्वरूप...
पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या
Article

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्या

पंचनाम्याचं नाटक थांबवा – शेतकऱ्यांना थेट नुकसान भरपाई द्यामहाराष्ट्रात पावसाचा धिंगाणा चालू आहे.पंचायतराज , नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणूका होऊ घातलेल्या आहे. मतदाराना गोंजारण्याचं काम सध्या नेते करत आहे. शेतकऱ्यांचं नुकसान पहाणी करण्यासाठी नेते बांधावर जात आहेत. प्रगत महाराष्ट्रातील प्रगत नेत्याची धावपळ सुरु आहे. नेत्यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्र एक प्रगत राज्य. प्रत्येक क्षेत्रात महाराष्ट्र नंबर एकच राज्य ;पण याच राज्यात आज शेतकरी ढसाढसा रडतोय. अनेकांची संसार उद्धवस्त झालेली आहेत. कांहीची जणावरे वाहून गेलीली आहेत.काहीजण पूरात वाहून गेलेत.कारण आहे राज्यातील शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्तीचं संकट.एक संकट ओसरत नाही,तोवर दुसरं संकट आ वासून उभा राहतोय.येथे कधी अतिवृष्टी,कधी दुष्काळ,तर कधी गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत राहतेय.मग जगाचा पोषिंदा लाचार होव...
‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’
News

‘…असं कार्य समाजाला दिशा दर्शक! आमदार काशिनाथ दाते यांचे गौरवोद्गार’

गौरव प्रकाशन पारनेर (प्रतिनिधी): पारनेर तालुक्यातील गटेवाडी येथे उद्योजक संतोष पवार यांनी कै. प्रवीण पवार व कै. सुजित पवार यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्ताने समाजहिताचा उपक्रम राबवत शेतकरी व विद्यार्थी बांधवांना मदतीचा हात दिला. या उपक्रमामध्ये गावातील सर्व शेतकऱ्यांना कृषी फवारणी पंप तर विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले.या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार काशिनाथ दाते उपस्थित होते. आपल्या भाषणात त्यांनी समाजहिताच्या या उपक्रमाचे कौतुक करताना भावना व्यक्त केल्या. “मी अशा प्रकारच्या कार्यक्रमाला पहिल्यांदाच आलो आहे. हजारो रुपये खर्च करून वक्ते बोलावण्यापेक्षा गावातील गरजू शेतकरी व विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणे ही खऱ्या अर्थाने समाजसेवा आहे. संतोष पवार यांनी दाखवलेला हा मार्ग समाजासाठी दीपस्तंभ ठरेल,” असे दाते यांनी सांगितले.या कार्यक्रमाला तालुका भाजप अध्यक्ष राहुल शिंद...