निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !
निरागस विद्यार्थी अन् हैवान शिक्षक !शिक्षण प्रक्रियेत शिक्षक व विद्यार्थी हे दोन महत्त्वपूर्ण घटक असून त्यांचा एकमेकांवर सतत परिणाम होत असतो. सध्याच्या माहितीच्या विस्फोटाच्या युगात शिक्षकांवरील जबाबदारी फार मोठी आहे. विद्यार्थी पालक व शिक्षक यांनी एकत्र येऊन विचार करण्याची वेळ आली आहे कारण उद्याचा समाज हा सतत शिकत राहणार आहे. यासाठी शिक्षकांची कार्यत्परता खूप महत्वाची आहे. शिक्षकांच्या छोट्य़ा-मोठ्या कृतीतून हे संस्कार जोपासण्यासाठी शिक्षक मातृहृदयी हवा. यामुळे मुलांचे दडपण कमी होते व आनंददायी शिक्षण होते. वर्गातील वातावरण प्रेरक होते.मात्र आज शिक्षकांच्या वाढत्या अश्लील हरकतीमुळे शिक्षण क्षेत्र बदनाम होत आहे. शिक्षकांच्या वाढत्या लैंगिक विकृतीमुळे शाळांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्न समोर आला आहे.कोणतीही शाळा असो आपल्याकडे गुरुंना सर्वात मोठे स्थान दिले गेले आहे. यामु...

