आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक…!
आजची व्यसनाधीनता आणि आम्ही भारताचे लोक...!
देशात झपाट्याने बेरोजगारी वाढत आहे.शिक्षण महाग होऊन ते तकलादू 'स्वरूपाचे' दिल्या जात आहे. त्यातून बेरोजगाराची 'फौज' निर्माण होत आहे. यावर' ब्र' शब्दही न काढणारी तरुण युवक 'मंडळी' वेगळ्याच स्वाभिमानाच्या, रूढी परंपरेच्या नादी लागून त्यांचे भवितव्य आधीच 'बरबाद' होत असतांना माणसाला 'तिसरा डोळा' प्रदान करणारी जन्म झाल्यापासून पहिल्यांदाच 'अ ब क ड' शिकवून पाया पक्का करणारी आपल्या भाषेतील आपली मराठी सरकारी शाळा देणगीदाराच्या देणगीने 'ठोक्याने' देण्यात येत आहे. यातच 'दारू' विक्रीसाठी गावा गावात परवाना देण्याचं सुनियोजित करण्यात आलं आहे. हे सर्व 'अचंबित' करण्यासारखं वाटत असलं तरीही त्यावर तरुणाई 'आवाज' उठवत नाही. मागचे 'इतिहास 'उकरून काढून तरुणांमध्ये वेगळाच जातीय अभिमान पेरला जात आहे. ही बाब सर्वसमावेशक समतेच्या विचाराचं 'खंडन' करीत एका विशिष्ट विचाराचं ...
