तीन वेळचे आमदार शेअर ऑटोमध्ये: वामनराव चटप यांचा साधेपणाचा धडा!
काल रात्री मी वर्ध्याहून ट्रेनने बडनेरा स्टेशनला पोहोचलो. स्टेशनच्या बाहेर ऑटो रिक्षाची वाट बघत उभा होतो. तेवढ्यात, एक रिक्षावाले एका सीनियर सिटीझनशी बोलताना दिसले. ते सीनियर सिटीझन म्हणाले, "मला चपराशीपुऱ्याजवळ सोडा." रिक्षावाले म्हणाले, "सौ रूपये होंगे!" ते सीनियर सिटीझन म्हणाले, "सौ रूपये आपको पुरता नही!" त्या ड्रायव्हरला ती गंमत वाटली.त्याने त्यांना निग्लेक्ट केलं. मग दुसरा ऑटावाला धावत आला. तो म्हणाला, "वो अंकल कहरे, देडसो दुगा!" त्या दोघांनाही ते गंमत वाटत होती; पण मला वाटले की ती गंमत नाही. मग, हळूहळू मी निरीक्षण केलं तर त्यांच्या छातीवर 'शेतकरी संघटना' 'स्वतंत्र विदर्भ राज्य' असे दोन बिल्ले मला दिसले. ते मला म्हणाले, "त्याला शंभर रुपयांत परवडणार नाही." मग मी त्यांना म्हणालो की, रिक्षावाल्यांना ही गंमत वाटते आहे! ते म्हणाले नाही, मला जायचं आहे ते ठिकाण आतमध्ये आहे. रिक्षावाल्या...
