बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळ
बीडमध्ये पत्रकाराच्या मुलाचा मित्राने केला धारदार शस्त्राने खून, शहरात खळबळबीड : शहरात काल रात्री (गुरुवारी, ता. २५) एका तरुणाची हत्या झाली. मृतक यश देवेंद्र ढाका (वय २२) हा स्थानिक वर्तमानपत्राचे पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा आहे आणि अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. माने कॉम्प्लेक्स परिसरात ही हृदयद्रावक घटना घडली.माहिती नुसार, यश आणि त्याचा मित्र सूरज काटे यांच्यात वाढदिवस साजरा करताना वाद निर्माण झाला होता. महिन्याभरापूर्वी देखील यश आणि सूरज यांच्यात भांडण झाल्याची नोंद आहे. या भांडणामुळे दोघांमध्ये वैर निर्माण झाला होता. गुरुवारी रात्री माने कॉम्प्लेक्स परिसरात वाद पुन्हा उफाळून आला.वाद इतका तीव्र झाला की सूरजने सोबत असलेला धारदार शस्त्र बाहेर काढून थेट यशच्या छातीत दोन आरपार वार केले. या वारांमुळे यश लगेचच रक्तबंबाळ झाला आणि कोसळला. जखमी अवस्थेत त्याला तातडी...
