साहित्यविश्व एकत्र आले… वाघ परिवारात मंगलमिलन.!
अहिल्यानगर (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील प्रसिद्ध कवी, लेखक, मुखपृष्ठ परीक्षक तथा साहित्यिक प्रशांत वाघ यांचे सुपुत्र प्रणित प्रशांत वाघ यांचा मंगल परिणय सोहळा रविवार, दि. १६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १२ वा. ४० मिनिटांनी वैजापूर (जि. छ. संभाजीनगर) येथील द्रौपदी लॉन्स, मापारी वस्ती, नागपूर रोड येथे संपन्न होणार आहे. वधू पूजा प्रकाश शिनगारे ह्या अव्वलगाव (ता. वैजापूर, जि. छ. संभाजीनगर) येथील प्रकाश कडूबा शिनगारे यांच्या कन्या आहेत.या सोहळ्यास संपूर्ण महाराष्ट्रातून साहित्यिक प्रेमी, कलाकार, उद्योजक आणि मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रमुख अतिथी तथा ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे, अहिल्यानगर यांनी दिली आहे.साहित्यिक प्रशांत वाघ यांचा साहित्यसेवेचा गौरवशाली वारसागेल्या चार दशकांपासून कवी प्रशांत वाघ यांनी साहित्य, काव्यलेखन आणि समी...
