पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!
पांडुरंगाच्या भक्तिरसात आस तुझी रे लागली.!
बारवाड, ता निपाणी जि बेळगाव कर्नाटक येथील मराठी भाषिक कवी रंगराव बन्ने , यांचा “आस तुझी रे लागली” हा पंढरीच्या पांडुरंगाच्या भक्तिरसात चिंब भिजलेला अभंग संग्रह नुकताच वाचनात आला. विविध अभंगातून त्यांनी भगवंताच्या प्रती आपली भक्ती व्यक्त केली आहे. “आस तुझी रे लागली” या अभंग कलाकृतीचे मुखपृष्ठ अतिशय सुबक आणि अर्थपूर्ण असून या मुखपृष्ठाला एक वैश्विक अर्थ प्राप्त झाला आहे. मानवी जीवनाचा व्यापक अर्थ या मुखपृष्ठावरून आपल्याला दिसून येतो. आज आपण या मुखपृष्ठावरील संदर्भाचा मानवी जीवनाशी कसा संबंध जोडला गेला याचा अभ्यास करणार आहोत.“आस तुझी रे लागली” या अभंग संग्रहाच्या मुखपृष्ठावर गगनाला भिडणारी पांडुरंगाची उंच मूर्ती दाखवली आहे, या पांडुरंगाच्या भेटीसाठी वैष्णवांचा मेळावा रस्त्याने जातांना दाखवला आहे तर एक वयोवृद्ध म्हातारा काठी टेकवत, पाठीवर गाठोडे, का...
