‘लघवीची सुटी’ आणि हरवलेलं बालपण.!
लहानपणी शाळेचं आयुष्य म्हणजे एक सुंदर प्रवास होता. त्या काळात प्रत्येक गोष्ट नवीन, निरागस आणि गंमतीशीर वाटायची. त्यातलीच एक मजेशीर आठवण म्हणजे “लघवीची सुटी”. ही सुटी खूपच छोटी असायची मधल्या सुटीच्या आधी काही मिनिटांची. पण आमच्यासाठी ती मोठी घटना असायची. त्या वेळी शाळांमध्ये शौचालयं नव्हती. शिक्षक वर्गात सांगायचे, “लघवीची सुटी झाली!” आणि सगळी मुलं धावत सुटायची. कुणी झाडामागे, कुणी शाळेच्या कुंपणाबाहेर. आम्ही मुलं त्यातही मजा शोधायचो. कुणी म्हणायचं, “पहा माझी लघवी किती लांब गेली!” तर कुणी तिचा रंग बघून टिप्पणी करायचं. त्या क्षणांत कोणतंही दडपण नव्हतं, लाज नव्हती, फक्त खेळ आणि कुतूहल होतं.लहानपणी प्रत्येक गोष्ट आम्हाला उत्सुकतेनं बघायला भाग पाडायची. आपण कसे जन्मलो, वडिलांना दाढी-मिशा आहेत पण आईला का नाहीत, आई-वडिलांच्या लग्नात आपण का नव्हतो असे प्रश्न सतत मनात यायचे. तेव्हा कोणी हसत हसत...
