मुलींच्या आरोग्याचा जागर – इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात रूबेला लसीकरण शिबिर
गौरव प्रकाशन अमरावती : विकसित भारत 2047 या केंद्र शासनाच्या उपक्रमांतर्गत विदर्भ युथ वेलफेअर सोसायटी संचालित इंदिराबाई मेघे महिला महाविद्यालयात दिनांक 27 सप्टेंबर 2025 रोजी विद्यार्थिनींसाठी मोफत रूबेला लसीकरण शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. या शिबिराचे आयोजन महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) पथक आणि भावना कॅन्सर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.या उपक्रमात महाविद्यालयातील 43 विद्यार्थिनींनी लसीकरण करून घेतले. प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित असलेल्या स्त्रीरोग व कॅन्सर तज्ञ डॉ. भावना सोनटक्के मॅडम यांनी विद्यार्थिनींना रूबेला लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले. तसेच किशोरवयीन मुलींसाठी आहार, योग व व्यायाम यांचा निरोगी आरोग्याशी असलेला संबंध स्पष्ट केला आणि त्यांच्या शंकांचे निरसन केले.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. ...
