राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहित
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे धर्मचिंतन: सर्वधर्म समभाव आणि मानवहितमित्रांनो जगाच्या पाठीवर अनेक धर्म व त्या -त्या धर्माचे संस्थापक होऊन गेले. प्रत्येक धर्माचं आपलं एक वेगळं तत्वज्ञान आहे.आणी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की कोणत्याही धर्मानं वा धर्मग्रंथानं आपलं मत मांडतांना एक दुसऱ्याला दोष दिला नाही. किंवा आपलाच धर्म श्रेष्ठ की इतरांचा कनिष्ठ यावरही भाष्यही केले नाही. प्रत्येकानं एक चांगलाच विचार समाजापुढे मांडलेला दिसून येतो.कोणताही धर्म वाईट विचारानं वागा असं जनमाणसास शिकवत नाही. विदर्भ पंढरीत जन्मलेल्या वं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सुद्धा हेच सर्वसमावेशक धर्म विषयक तत्वज्ञान सांगितले आहे. राष्ट्रसंतांनी जी परिस्थिती भजन, किर्तनाच्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या गावांच्या दौऱ्याच्या निमित्ताने सर्व बारकाईने अवलोकन केली होती. त्यातूनच त्यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध बनले होते. ज्या ज्या ध...
