Sunday, October 26

Tag: #राजकीय नेते

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग
Article

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभाग

बंजारा समाजाचा एल्गार: एस.टी. आरक्षणासाठी समाज, युवा आणि राजकीय नेत्यांचा सहभागबंजारा समाज हा भटक्या जीवनशैलीसाठी परिचित आहे. व्यापारी, पशुपालक,धान्यवाले,वाहतूक करणारे,जंगलातून स्थलांतर करणारे असे विविध व्यवसाय समाजाने इतिहासात केले.ब्रिटिश राजवटीत वसाहती कायद्यांतर्गत त्यांना “गुन्हेगार जमाती”चा शिक्का बसला होता.हा डाग १९५२ नंतर दूर झाला,पण सामाजिक व आर्थिक परिणाम मात्र आजतागायत जाणवत आहेत.बंजारा समाजात शिक्षणाच्या संधींची कमतरता,गावाबाहेर वसाहती,आरोग्याची दयनीय अवस्था,स्त्री-पुरुष दोघांच्याही रोजगारातील मर्यादा या कारणांमुळे बंजारा समाज अजूनही मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.शिक्षण,नोकरभरती,राजकीय प्रतिनिधित्व या क्षेत्रांत त्यांचे प्रमाण अत्यल्प आहे.म्हणूनच त्यांची मागणी आहे की त्यांना अनुसूचित जमाती प्रवर्गात (एस.टी.) समाविष्ट करावे.महाराष्ट्रातील विविध समाजघटकांनी मागील काही दशकांत...