या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!
या पाच देशात खाद्यपदार्थांवर आहे बंदी.!
सिमोलीया, फ्रान्स, अमेरिका, युनायटेड किंगडम, सिंगापूर या पाच देशात विविध खाद्यपदार्थांवर बंदी घालण्यात आली आहे. तर जाणून घेऊया, असे कोणते खाद्यपदार्थ आहेत.
* सामोसा :
सिमोलिया या देशात समोसा या पदार्थांवर बंदी घातली आहे. यादेशातील अल-शबाब या पक्षाच्या नेत्यांना समोसे हे आक्षेपार्ह वाटतात. त्यांच मत असे आहे की, समोसाचा आकार हा त्रिकोणी आहे. हा आकार ख्रिश्चन धर्माच्या ट्रिनिटीसारखा आहे. म्हणून येथे या पदार्थाला बंदी आहे.
* केचअप :
फ्रान्स देशात केचअप या पदार्थावर बंदी आहे. पकोडे, कटलेट असे अनेक पदार्थ आपण खाताना केचअप घेत असतो. त्याशिवाय असे पदार्थ स्वादिष्ट लागत नाहित. मात्र फ्रान्स देशात या पदार्थाला बंदी आहे. या देशाचे असे म्हणणे आहे की, फ्रान्सच्या पारंपरिक पाकशैलीला या पदार्थाचा धोका आहे. या पदार्थामुळे फ्रेंच स्वादाचीलोकप्रियता कमी होईल.
...
