मैफल म्हाताऱ्यांची..!
एका संध्याकाळी आजोबांची मैफल जमली. एक आजोबा सांगत होते. "आमच्या मुलानं जुना टीव्ही विकला, आणि भला मोठा नवा टीव्ही आणला. तुम्हाला म्हणून सांगतो, मला जरा वाईट वाटलं. जुन्या काळी पै पै साठवून, मी तो ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही घेतला होता. पोरानं शब्दानं तरी विचारायचं ना.म्हातारं झाल्यावर कोण काय विचारतो म्हणा. आपल्याला कारभाराच्या सवयी लागलेल्या. खरं म्हणजे हळूहळू सगळे अधिकार सोडून, शांतपणे जगायला पाहिजे. पण लहान पोरांत आणि म्हाताऱ्या माणसांत तसा काही फरक नसतो असं म्हणतात, ते काही खोटं नाही. सगळं कळतं, पण वळत नाही.
तर मुलगा म्हणाला, 'बाबा, तुम्हाला कमी दिसतं म्हणून, मोठा टीव्ही आणला.'मी म्हणालो, 'बापाची काळजी असणारी अशी मुलं आजकाल दुर्मिळ झाली आहेत.' तेव्हा तो छानपैकी हसला. त्याला वाटलं की आपण म्हाताऱ्याला फसवलं. मात्र, त्याची बायको महिन्यापासून मोठ्या टीव्हीसाठी मागं लागली होती, हे मला माहित...
