Sunday, October 26

Tag: मायबोली

Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...