स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते…!
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते
स्मशानभूमीत प्रेत एकटेच जळत होते
ते पाहून असंख्य प्रश्नांनी मनात एकच गदारोळ उत्पन्न केला होता....
हेच ते प्रेत जिवंत असताना माझेमाझे करत असेल, एक एक रुपयासाठी झगडत असेल, मोह - माया - काम - क्रोध - मत्सर यांना घेऊन समाजात जगत असेल, आरे ला कारे करणारा देह , आज मात्र जळतोय शांत, स्तब्ध, एकाकी तरीही शांतपणे पडून स्वतःला जाळून घेतोय..
जीवलगांनी त्यांच्यासाठी जीव लावला. ते आज ओक्साबोक्षी रडले. घरा पासून स्मशानभूमी पर्यंतच सोबती झाले-खरे; परंतु विधी संपताच त्यांनी घराचा रस्ता धरला. घरी जाऊन त्यांनी सुद्धा कडू घास काढण्यासाठी दोन चार घास पोटात घातले असतील, आज दोन चारघास पण उद्या पासून पोटभर अन्न खातील ते.
जमवलेल्या लाखो रूपयाच्या संपत्तीपैकी फक्त फुटका रूपया मुखात आलाय, जीवनात १०० एकर जमिनीच्या तुकड्याला खरेदी केले, तरीही जाळायला नेले स्मशानभूमीतील एकाकी घा...
