Sunday, October 26

Tag: #महिला सबलीकरण

ती खूप बदलली आहे
Poem

ती खूप बदलली आहे

ती खूप बदलली आहेसमांतर आरक्षणातून मिळालेल्या नोकरीने घरादारात तिचेमहत्व वाढले आहे..ती अबला नव्हेआता सबला झाली आहे..हो, ती खरोखरच आता धीट झाली आहे.दर गुरूवारी धावपळ करते..नारळ आणते..साखर आणते..आरतीसाठी पुढे सरते...सर्वांना हिंमतीने प्रसाद वाटते..आता ती खूप बदलली आहे,कुंकूवाच्या जागी टिकली लावते.तिला कळालेय कपड्यांचे मोल,म्हणूनच ती सुंदर पेहराव करते,मॅचिंगवर दक्षअसते.वाचनातही ती मागे नाही,ती वाचते प्रवासातहीवैभवलक्ष्मीची पोथी...दानातही ती कमी नाही,म्हणूनच ती संक्रांतीच्या वानात वाटतेश्रद्धेने व्रताच्या पोथ्या...हजारो वर्षाची लेखन बंदी झुगारुनती लिहू लागलीय आता२१ हजार वेळा गायत्रीमंत्रतिच्या नोटबूकात...तिला चांगला आवाज लाभलाय,म्हणूनच तर ती सत्संगात जाते,सुरेल आवाजात गाते...एवढेच...