Sunday, October 26

Tag: #महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे
News

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरे

महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते आता द्या – उद्धव ठाकरेपुणे : “निवडणुकीच्या आधी जशा महिलांच्या खात्यात दोन-तीन महिन्यांचे हप्ते जमा केले, तसेच आता पुढच्या सहा महिन्यांचे हप्ते द्या, कारण सध्या गरज आहे महाराष्ट्राच्या लाडक्या बहिणींना,” अशी ठाम मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पुण्यात झालेल्या अजित नागरी पतसंस्थेच्या महिला बचत गट कर्जदार भगिनींना कर्जमुक्ती प्रमाणपत्र वाटप व कृतज्ञता सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.ठाकरे म्हणाले, “लोकशाहीची ही दुर्दैवी अवस्था आहे की, कोर्टात न्याय मिळवण्यासाठी वर्षानुवर्षे वाट पाहावी लागते. हातात दांडूका घेतल्यावरच न्याय मिळतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. सर्वोच्च न्यायालयात आमची केस सुरू आहे. आता आठ-दहा दिवसांत तारीख आहे, पण न्याय मिळायला २०४५–२०५० पर्यंत वाट पाहावी लागेल अशी आ...
मटण खाल्लं पण उधारी गिळली!  कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!
News

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!

मटण खाल्लं पण उधारी गिळली! कोल्हापूरच्या दुकानदाराची भन्नाट उधारी वसुली शक्कल!कोल्हापूर : “मटण खाल्लं पण उधारी गिळली!” हे वाक्य सध्या कोल्हापूर जिल्ह्यात अक्षरशः हेडलाईन बनलं आहे. बहिरेश्वर गावातील चिकन-मटण विक्रेता सदल्या काशिद यांनी उधारी वसुलीसाठी घेतलेली हटके शक्कल आता चर्चेचा विषय ठरली आहे.ग्राहकांकडून उधारी वसूल होत नसल्यामुळे त्रस्त झालेल्या सदल्या काशिद यांनी थेट गावाच्या चौकात डिजिटल बोर्ड लावून सर्वांना इशारा दिला आहे. या बोर्डवर मोठ्या अक्षरात लिहिलं आहे —“उधारी लवकरात लवकर जमा करा, अन्यथा दिवाळीमध्ये उधारीवाल्यांची नावं बोर्डवर झळकतील!”या इशाऱ्यामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे. ज्यांनी कधी ‘फक्त थोडीशी उधारी’ केली होती, त्यांनाही आता आपलं नाव बोर्डावर येईल की काय, अशी धास्ती वाटू लागली आहे.कोल्हापूर हा रस्सा आणि मटणासाठी प्रसिद्ध जिल्हा. पण आता इ...
शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग
News

शेगाव हादरलं! गुंगीचे औषध पाजून विवाहितेवर वारंवार अत्याचार; आरोपीच्या बहिणीचाही सहभाग

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातून संतापजनक व अंगावर काटा आणणारे प्रकरण उघडकीस आले आहे. विवाहित महिलेला गुंगीचे औषध पाजून तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात आरोपीसोबत त्याची बहीणही सामील असल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. या घटनेमुळे शेगाव शहर हादरले असून महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.फिर्यादी विवाहित महिलेने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी सचिन ज्ञानेश्वर चोपडे याने तिला आपल्या घरी बोलावले. तिला चहा देत त्यामध्ये गुंगी आणणारे औषध मिसळले आणि ती शुद्ध हरपल्यावर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर पीडितेचे नग्न अवस्थेतील फोटो आणि व्हिडिओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. या भीतीमुळे पीडिता दीर्घकाळ आरोपीच्या अत्याचाराला बळी पडत राहिली.या गुन्ह्यात आरोपीच्या बहिणीचीह...
वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय
News

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोय

वर्ध्यात दुर्दैवी घटना : धावत्या दुचाकीवर वीज कोसळली, काका-पुतण्याचा जागीच मृत्यू; मुलगा जीवासाठी झुंजतोयवर्धा : नैसर्गिक आपत्तीपुढे माणूस किती असहाय्य ठरतो याचं हृदय पिळवटून टाकणारं उदाहरण वर्धा जिल्ह्यात पाहायला मिळालं. शुक्रवारी (२६ सप्टेंबर) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सोनेगाव-अल्लीपूर मार्गावरून चारमंडळकडे जात असताना अचानक विजेचा कडकडाट झाला आणि धावत्या दुचाकीवरच वीज कोसळली. या भीषण घटनेत काका आणि पुतण्या जागीच ठार झाले, तर मुलगा गंभीर जखमी झाला.भिवापूर येथील अनिल ठाकरे हे आपल्या १७ वर्षीय मुलगा वेदांत व पुतण्या सौरभ यांच्यासोबत दुचाकीवरून सोनेगावमार्गे चारमंडळकडे जात होते. दरम्यान, अचानक पावसाला सुरुवात झाली आणि आकाशात विजांचा कडकडाट वाढला. धोतरा चौरस्त्यावर पोहोचताच त्यांच्या दुचाकीवर वीज कोसळली. या प्रचंड आघाताने अनिल ठाकरे आणि त्यांचा पुतण्या सौरभ यांचा जागीच मृत्यू झ...
शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी
Article

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वी

शकुंतला रेल्वे ब्रॉडगेज प्रकल्प | डीपीआर मंजुरीने सात वर्षांचा संघर्ष यशस्वीशकुंतला रेल्वेचा ऐतिहासिक प्रवासब्रिटिश काळापासून अस्तित्वात असलेली शकुंतला नॅरो गेज रेल्वे हे विदर्भाचे वैशिष्ट्य मानले जात असे. मूर्तिजापूर–दर्यापूर–अचलपूर या मार्गावर धावणारी ही रेल्वे अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेली आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद आहे. प्रवाशांची जुन्या काळापासून असलेली एकच मागणी म्हणजे हा मार्ग ब्रॉडगेजमध्ये बदलावा. आता अखेर या मागणीला प्रत्यक्ष गती मिळाली आहे.सात वर्षांचा अखंड संघर्ष2018 पासून शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समिती सातत्याने हक्काची लढाई लढत होती. उपोषण, रस्ता रोको, आंदोलन अशा विविध मार्गांनी त्यांनी शासनाचे लक्ष वेधले. 2022 मध्ये एफएलएस (फायनान्स लोकेशन सर्वे) मंजूर झाला होता, मात्र डीपीआरच्या अभावामुळे प्रकल्प रखडला. या सग...