भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!
भाषा संवर्धनात ग्रंथालयांची मोलाची भूमिका.!भाषा विकासासाठी मराठी ग्रंथालयांची संख्या वाढवणे आवश्यक आहे कारण ते ज्ञान आणि माहितीचे केंद्र आहेत.मराठी भाषेची समृद्धता आणि संवर्धनात ग्रंथालयांची भूमिका फार मोलाची आहे. प्रत्येक शाळा व महाविद्यालयीन ‘ग्रंथालय’ समृद्ध होणे गरजेचे आहे. वाचनामुळे लेखन कौशल्य मुलांना अवगत होते. ग्रंथालयामार्फत शालेय जीवनामध्ये चालवल्या जाणार्या वाचन चळवळीमुळे मुलांमध्ये आमूलाग्र बदल होतात. त्यांची भाषाशैली व वैचारीक परिपक्वता सुधारते. ग्रंथालय चळवळ समृद्ध करणे ही सामूहिक जबाबदारी आहे.भाषा संवर्धन आणि ग्रंथालये यांचा घनिष्ठ संबंध आहे, कारण ग्रंथालये भाषेचे जतन आणि विकास करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ग्रंथालये माहिती आणि साहित्याचा संग्रह करून भाषेचा प्रचार आणि प्रसार करतात, तसेच भाषेच्या अभ्यासासाठी व शिक्षणासाठी आवश्यक सुविधा पुरवतात. यामध्ये सा...
