ती चिमणी… जी कधी विझली नाही!
ती चिमणी… जी कधी विझली नाही!मागच्या आठवड्यात गावी एक शेजाऱ्यांचे लग्न होते. त्या लग्नासाठी एकटाच गावी गेलो होतो. लग्न संध्याकाळचे होते. दुपारी घरात उन्हाने फार उकडत असल्याने बाजूला चिंचेच्या झाडाच्या सावलीला असलेल्या जनावरांच्या गोठ्यात बाजेवर सहज पडलो होतो. मधूनच मोबाईल चाळत होतो. उन्हाने आळस येऊन डोळ्यांवर झापड येत असायची. तेवढ्यात मला कुणीतरी दाराजवळ बोलत असल्याचा आवाज आला. "काय रं? कधी आला?" तिथे दिसत तर कुणी नव्हते. आणि मला 'आरे-तुरे' कोण म्हणत असावे? असा मला प्रश्न पडला. मी आपला इकडे-तिकडे बघत होतो. 'इथे भुताटकी तर नाही ना?' अशी शंका मनात येऊन गेली. कारण लहानपणी अनेकदा पिंपळाच्या, जुन्या वडाच्या, चिंचेच्या झाडांवर भुते असतात, हे अनेकदा ऐकलेले होते....
