मन शांतीसाठी भगवान बुद्धाची शिकवण अंगिकारण्याची गरज
सध्याचे युग हे तंत्रज्ञाचे व धावपळीचे आहे. सध्याचे युग हे आधुनिकसुद्धा आहे. प्रत्येकाचे राहणीमान पण उंचावले आहे. त्यामुळे प्रत्येकाचा खर्च पण वाढला आहे. हा खर्च करण्यासाठी चांगल्या रोजगाराची सुद्धा गरज आहे. आज सहज रोजगार उपलब्ध व्हायला पाहिजे परंतु रोजगार मोठ्या प्रमाणात कमी होऊन लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. ही अशी परिस्थिती आपल्या भारत देशातच नाही तर संपूर्ण विश्वात आहे. महागाई वाढत आहे, राहणीमान अधिक खर्चिक झाले आहे ह्यामुळे प्रत्येकजण हा तणावात आहे.चांगल्या राहणीमानासाठी अधिक पैशाची गरज आहे. रोजगार नसल्यामुळे लोक अन्य गैरमार्गाने पैसे मिळवायला लागले आहेत. गैरकृत्यामुळे लोकांची मनशांती भंगलेली आहे. जो तो तणावात आहे.प्रत्येकाला शांती ( peace ) आणि एकांतवास (space) हवा आहे. एकत्र कुटुंब पद्धती जवळपास लयालाच चालली आहे. जो तो शांती (peace) आणि एकांतवास (space) शोधण्याच्या विचारत आहे...
