मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!
मचानवरून हरभऱ्याच्या वावरात; हरवलेल्या ग्रामीण दिवसांची आठवण.!आमच्या वेळेस शिदोरी बांधून पहाटे गेलेल्या बैलजोड्या सयसंध्याकाय होईपर्यंत घराकडे परतत नसायच्या. रस्त्यानं बैलगाडी घेऊन घरी येईस्तोवर दिवेलागण होऊन साजरा अंधार पडायचा. आम्ही बैलबंडीत गूडूप अंधारात बसलेलो. पण बैल मात्र सरावानं बरोबर घरालोक चालत चालत घरापर्यंत सुखरूप आम्हाले सोडायची. सुगीच्या दिवसात जंगलात जिकडे तिकडे कामासाठी माणसांची वर्दळही वर्दळ दिसायची.पशुपक्षीही भरपूर प्रमाणात सोबतीला असायचे.हरणाचे कळपच्या कळपं समोरून धावायचे.दुपारच्या सामसूम वातावरणात भोरी नावाचा पक्षी 'पोट दुखते' म्हणजे घुगुच घु असा स्वर, आवाज काढून आपल्या अस्तित्वाची जाणीव करून द्यायचा.टिटवीचा आवाज,कावळयाची कावकाव शांत आसमंतात नखोरा ओढायचा.एखादया दूरच्या शेतातल्या कडूलिंबाच्या झाडावर माकडं या फांदीवरून तर त्या फांदीवर मसत्या करायची.हूपहूप करत मोठय...
