Monday, October 27

Tag: भेट….!

भेट : एका देव माणसाची
Article

भेट : एका देव माणसाची

भेट : एका देव माणसाचीगोष्ट एका प्रवासातली.4-5 दिवसांपूर्वीची.वर्ध्याहून पुढे10 मैलांवर गाडी अचानक बंद पडली. भर दुपारी,रखरखत्या ऊन्हात.दुरुस्तीच्या प्रयासात 1तास गेला.नाही जमले.मग नागपूरहून दुसरी गाडी बोलावली.यात 3 तास गेले.कसे? .... बाजूला एक शेत होतं.गेटवर वकिलाची पाटी.आत चौकीदार असावा.पाणी मागावं म्हणून आत गेलो.बनियन-पैजामा घातलेला एक गृहस्थ भेटला.त्याला विनवणी केली.बोलताना लक्षात आलं,तो मालकच होता.साधा-सरळ.मीही शेतकरीच.त्यामुळे बोलका झाला तो.त्यानं आपल्या शानदार कुटीत नेलं.झुल्यावर बसवलं.दरम्यान माझी मिसेस वर्षा व मुलगाही आला.थंडगार पाणी मिळालं.जीव तृप्त झाले!हे कुटुंबच इथं शेती- मातीत राहणारं..राबणारं.त्यानं आपली जीवनयात्रा सांगितली.दरम्यान बाईनं चहा आणला.तीही सुस्वभावी.म्हणाली,घरच्याच गायीच्या दुधाचा.तो बोलत राहिला.मन मोकळं करत राहिला.मग शेतातीलच पपई खायला दिली.वाटलं-आपण कोण, कुठल...