Monday, October 27

Tag: #भुलाबाई#भाद्रपद पौर्णिमा#पारंपरिक सण#महाराष्ट्राची लोकसंस्कृती#गावातील गाणी#विसर्जन सण#लोकसंगीत#ग्रामीण आनंद

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी
Article

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणी

भुलाबाईची गाणी: महाराष्ट्रातील पारंपरिक सण आणि आठवणीआमच्या लहानपणी भुलाबाईच्या सणाची व गाण्यांची वेगळीच मजा असायची. हल्ली आता ही मजा पहायला भेटत नाही.सारं टिपीकल व बेगडी वाटते.असं वाटते या लोकसंस्कृतीचे वाहक असलेल्या सणाला हल्ली बेगडीपणाच रूप शिल्लक राहिलं की काय?असं वाटायला लागतं.आज पुन्हा भुलाबाईच्या निमित्तानं लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या. भाद्रपद महिन्याच्या सरत्या शेवटी गणपती,दसरा व नवरात्र सणाच्या समाप्ती नंतर भाद्रपद पौर्णिमा दिवशी अशा भूलाबाई महाराष्ट्रात घरोघरी बघायला मिळतात.पूर्वी अशा तयार रंगरंगोटी केलेल्या मुर्त्या आमच्या खेडेगावात नसायच्या. नदीकाठावरील कुंभाराच्या पजायावरची लूसलूसीत माती घेऊन व मस्त त्यात घोड्याची लीद मिसळून पाणी टाकून एकजीव केल्यानंतर छान भुलाबाई बनवायचो. हातानं भुलाबाई तयार करून ज्वारीचे टपोरे दाणे डोळे म्हणून लावायचो.व दुकानातून आठान्याचा गे...