बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा
गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू, गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले. बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...

