Sunday, October 26

Tag: #भावनिक कथा

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग
Article

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जग

लेकीसाठी : स्वातंत्र्याची किंमत आणि एका बाईचं न बोललेलं जगप्रिये,"जागतिक महिला दिनाच्या तुला खूप खूप आणि मनापासून हार्दिक शुभेच्छा. बस. आराम कर. दमली असशील." चेहऱ्यावर हसू आणत त्याने तिला बाजूच्या खुर्चीवर बसण्यासाठी खुणावले आणि पुढे बोलू लागला. "मागच्या वर्षी याच दिवशी तुला मी आश्वासन दिले होते. बघ ते पूर्ण केले कि नाही?" तो बोलत होता. त्याच्याकडे कान देत, त्रासिक आणि थकलेल्या भावनेने ती बाजूच्या खुर्चीवर बसली. त्याच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया द्यावी? हे न कळल्याने ती, तो नाराज होऊ नये म्हणून चेहऱ्यावर उसने हसू आणत त्याचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागली. खरेतर काही ऐकून घेण्याच्या मानसिकतेत ती नव्हती. तो पुढे बोलू लागला, "मी तुला बोललो होतो. तुझ्या मनात जे काही आहे, ती इच्छा तू पूर्ण करू शकते. तुला शिकायचे असेल, कुठे फिरायला जायचे असेल, काही खायचे असेल, जे काय ल्यायचे असेल, ते तू करू शकत...
बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा
Article

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथा

बाप मरायला नव्हता पायजे | भावनिक हृदयस्पर्शी कथाचांगलं आठवतंय. होय अगदी चांगलं आठवतयं. अन् आठवतंय म्हणून स्वत:ची लाजही वाटतीये. तेव्हा मी कॉलेजला होतो. अभ्यास करायचो, पण अभ्यासापेक्षा उनाडक्या जास्त करायचो. उनाडक्या करायला पैसा लागायचा. अन् पैसा कमवायची तर काही अक्कल नव्हती. म्हणून मग वडलांबरं खोटं बोलायचो अन् त्यांच्याकडून पैशे उकळायचो.बाप आमचा अडाणी. म्हणजे तसा शिकलेला. एसटीत कंडक्टर. पण, नाकाच्या सरळ रेषेत चालण्याची सवय असल्यानं बाकी भानगडीत पडत नव्हता. पोरगा मोठ्या कॉलेजला शिकतोय याच्यातच त्यांना मोठं समाधान वाटायचं. मग, उसणंपासणं कर, उपाशी राहून डबल ड्युटी कर असलं काय काय करुन ते मला पैशे द्यायचे अन् मग मी पोरांसोबत पिक्चरला जायचो. फिरायला जायचो. पोरी फिरवायचो.एकदा तर एक पोरगी म्हणाली, ‘तुझे वडील काय काम करतात?’ तर ते कंडक्टर आहेत, हे मला सांगायला लाज वाटली. म्हणून मी ति...