Tuesday, November 4

Tag: बौद्ध

बौद्ध संस्कृती आणि संस्कार
Article

बौद्ध संस्कृती आणि संस्कार

बौद्ध संस्कृती आणि संस्कार बौद्ध धर्म उदयास आल्या पासून बौद्ध संस्कृतीचे संस्कार उदयास आले. वयाच्या ऐंशीव्या वर्षापर्यंत सतत पायी फिरून बुद्धांनी त्यांच्या धम्माचा प्रचार प्रसार केला. बुद्धाच्या जीवन काळामध्ये धम्म वेगाने वाढून पुढे राजाश्रय मिळाल्यामुळे अधिक भरभराटीस आला. अनेक राज्यांनी बौद्धधर्म स्वीकारल्यामुळे प्रजाही बौद्ध बनली होती. बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर ही अनेक राजाद्वारे बुद्धाच्या अस्थींच्या रूपाने स्तुपांची निर्मिती करण्यात आली. बुद्धाची प्रतिमा तयार करण्यात आली. श्रद्धा भाव व्यक्त करण्यासाठी पालि गाथांची निर्मिती करण्यात आली. बुद्धांचा उपदेश ताडपत्र्यावर, झाडांच्या सालीवर, पुढे पाषाणावर कोरण्यात आलेले होता व त्यानुसार बुद्धाचे अनुयायी आचरण करीत असे. सम्राट अशोकाच्या काळात तर बुद्ध धर्माला फारच भरभराटीचे दिवस आले होते. बुद्धाच्या अस्तिवर चौर्‍याऐंशी हजार स्तूप निर्माण करून...