संत गाडगेबाबा : एक चालते बोलते संस्कार पीठ
Sant Gadgebaba : संत गाडगेबाबा :- एक चालते बोलते संस्कार पीठ
----------------------------------------
अशिक्षितपणामुळे समाजाची काय हानी होते. हे अगदी जवळून पाहिल्यामुळे शिक्षणाची ज्ञानगंगा घराघरात पोहचावी यासाठी एका अडाणी असलेल्या अवलियाने अफाट प्रयत्न करून शिक्षण हे किती महत्त्वाचे आहे हे समाजाला पटवून दिले. आणि ते विद्वान म्हणजे वैराग्यमूर्ती गाडगेबाबा होय. गाडगे बाबांचा जन्म 23 फेब्रुवारी 1876 ला महाशिवरात्रीच्या दिवशी झाला. त्यांचे मूळ नाव डेबुजी झिंगराजजी जानोरकर होते. गाडगे बाबाच्या आठव्या वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील व्यसनाने ग्रासलेले होते. व्यसनामुळे आपल्या परिवारावर सुद्धा त्यांचे दुर्लक्ष होते ,त्यामुळे त्यांच्या कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था होती. आणि बालवयात गाडगे बाबा आपल्या घरची ही सर्व परिस्थिती पहात होते. आपले वडील अशिक्षित असल्यामुळे आणि त्यांना व्यसन...
