बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शन
बैलपोळा सण : शेतकऱ्यांचा सच्चा मित्र बैल आणि ग्रामीण संस्कृतीचं दर्शनसालाबादप्रमाणे वर्षाच्या श्रावण अमावस्येच्या दिवशी म्हणजे पीठोरी अमावस्येच्या दिवशी पोळा हा सण येतो.हा दिवस म्हणजे शेतकऱ्यांना व त्याच्या कुटुंबातील लोकांना अगदी आनंदाचं उधाण आणणारा असतो. भारत हा कृषिप्रधान देश असून ७०% लोकांची उपजीविकेचं साधन हे बहुतांश शेतीवरच अवलंबून आहे. म्हणजे शहरांपेक्षा खेडयाची वसाहत आजही जास्त प्रमाणात आहे.हल्ली शेतीचं बहुतांश ठिकाणी यांत्रिकीकरण झालं असलं तरी बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांनी अजूनही बैलजोड्या आपलं अस्तित्व म्हणून राखून ठेवल्या आहेत. आणखी हा दिवस बैल पोळा म्हणून ग्रामीण व शहरी भागामधून फार मोठ्या आंनदाने साजरा केला जातो. पोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांना दररोजच्या शेतीच्या कष्टाच्या, मशागतीच्या कामापासून थोडा आराम दिला जातो. गावातील कुशल बैलांची शिंगे,खुरं काढणाऱ्य...
