बुलबुलवाले युसुफभाई.!
बुलबुलवाले युसुफभाई.!शहरात गतकाळात एक बँड ग्रुप चांगलाच फेमस होता. काळाच्या ओघात मागील दोन दशकांत लहान मोठे बँड मोठ्या संख्येत बंद पडले. यात कामाला असणाऱ्या कलाकारांपैकी अनेकांनी आपला व्यवसाय बदलला. त्यांना चरितार्थाची सोय जमली. मात्र ज्यांची उमर या पेशात ढळून गेली होती त्यांना परिवर्तन करण्याची संधी मिळाली नाही. मिळेल ते काम करत राहणे त्यांच्या नशिबी आलेलं. युसुफभाई त्यातलेच एक. ते अगदी उत्तमरित्या बुलबुल / बँजो वाजवत. काही वर्षापूर्वी त्यांचा बँड बंद पडला असला तरी त्यांची कला जिवंत होती. कुणीही बोलवलं तरी ते हजर होत! पैसे मिळाले नाही तरी चालेल मात्र आपला हात हलता राहिला पाहिजे ही त्या भल्या माणसाची विचारसरणी!कालांतराने ते सद्यकालिन संगीताच्या मागे पडत गेले. त्यांना ज्या ट्यून्स यायच्या त्याची फर्माईश कुणीच करत नसे. नव्या पिढीच्या झिंगंत नाचणाऱ्या पोरांना जी गाणी आवडत ती त्यांना बँजोव...
