Tuesday, November 4

Tag: बुद्ध धम्म व बुद्ध धम्माची शिकवण

बुद्ध धम्म व बुद्ध  धम्माची शिकवण
Article

बुद्ध धम्म व बुद्ध धम्माची शिकवण

 भारतीय तत्त्वज्ञ,शांततेचे महासागर,मानवतावादी - विज्ञानवादी बौद्ध धम्माचे संस्थापक तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धांना जयंती निमित्त विनम्र वंदन ! बुद्ध पौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !          बुद्ध हे नाव नाही तर ज्ञानाची उपाधी आहे.बुद्ध या शब्दाचा अर्थ  'आकाशाएवढा प्रचंड ज्ञानी असा आहे .ही उपाधी सिद्धार्थ गौतम बुद्धांनी स्वप्रयत्नांनी मिळविली आहे . संबुद्ध म्हणजे बुद्धत्व - संबोधी ( ज्ञान ) प्राप्त - स्वतःवर विजय मिळविलेला आणि स्वतः उत्कर्ष  करू शकणारा महाज्ञानी बुद्ध आणि संमासंबुद्ध म्हणजे बुद्धत्व संबोधी (ज्ञान ) प्राप्त असलेला, स्वतः सोबतच संपूर्ण जगाचा उत्कर्ष - उद्धार करू शकणारा महाज्ञानी बुद्ध.बौद्ध अनुयायी तथागत गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध म्हणजेच संमासंबुद्ध मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत गौतमबुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात.     आशिया ख...