बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थ
बिहार विधानसभा निवडणुकीचा अन्वयार्थबिहार विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित एन डी ए ला घवघवीत यश मिळाले.. फिर से एक बार बिहार मे एन डी ए सरकार हा नारा अखेर खरा ठरला..सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप ने सर्वोत्तम कामगिरी केली.नितीश कुमार यांच्या जेडीयूला दुसरे स्थान मिळाले.बिहारचे निकाल केवळ सत्ता परिवर्तनाची कहाणी दडलेली नाही नाहीत, तर या जनादेशामुळे विरोधी पक्ष आणखी तुटला, तर एनडीए राज्यापासून केंद्र सरकारपर्यंत अधिक मजबूत होऊन उदयास आला. केंद्रात एन डी ए आता अजून मजबूत झाला असून केंद्र सरकारला आता निर्णय घेणे शक्य होणार असून राज्यसभेत देखील स्थिती मजबूत झाली आहे.या निकालाने पुन्हा एकदा एन डी ए ची स्थिती मजबूत झाली असून या निकालांमुळे महाआघाडीची मोठी पिछेहाट झाली आहे. विरोधकांचा पुढचा मार्ग गुंतागुंतीचा झाला आहे. महाआघाडी कशी प्रगती करेल यावर त्यांचा थेट परिणाम होईल. महाआघाडीला एकजूट ठेव...
