बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्र
बारा बलुतेदारांच्या पलीकडचे ग्रामीण लोकजीवन ; हरवलेली परंपरा आणि बदलते काळाचे चित्रआपल्या महाराष्ट्रात विसाव्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धादरम्यान पिढ्यानं पिढ्या चालत आलेली बारा बलुतेदार ही वस्तूविनिमय पद्धतीवर आधारलेली पद्धत ग्रामीण जीवनाचा अविभाज्य अंग होती.त्यात मुख्यत: वस्तू किंवा कामाच्या मोबदल्यात धान्याची देवाणघेवाण होत असे.कुंभार, लोहार, सुतार, चांभार, न्हावी, धोबी, महार, माळी, तेली, गुरव, कोळी, मातंग…असे ते बारा बलुतेदार होत.त्यांच्या व्यवसायानुरुप ही नावे पडलेली दिसतात. ज्यांनी मागील शतकात ग्रामीण जीवन अनुभवले आहे त्यांना ही पद्धत माहित आहे. ह्या व्यतिरिक्त ग्रामीण जीवनाचा भाग बनलेली काही व्यवसायिके होती.ती मात्र आपण लक्षात घेत नाही.त्याचाच आढावा घेणारा हा लेख.बेलदारबेलदार समाजातील ही मंडळी कुटुंबकबिल्यासह भटकंती करीत गावोगावी मातीची घरे बांधण्याची कामे करीत होती. मा...
