बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!
बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो 'आभाळमाया' झाला.!
वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा. आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो! मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की अपराधीपणाची भावना दाटून येते. आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले? याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.
जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला. धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो. खरं तर, आता कळतं की वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती, त्यातही कोमलता होती पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो तसं वडिलांचं झालेलं असतं.
गरजांच्या चौकटीत त्यांना कुटुंबव्यवस्थेनं असं काही चिणलंय की त्यांची दुसरी तसबीरच समोर येत नाही. गरजा पूर्ण करणारा निष्ठूर माणूस असं काहीसं भकास चित्र उभं ...
