Sunday, October 26

Tag: बाप

बाप आहे म्हणून…..
Article

बाप आहे म्हणून…..

बाप आहे म्हणून…..काही दिवसापूर्वी मी पुण्यात असताना एका महत्वाच्या मिटिंग बसलो होतो. माझ्या सोबत चारजण क्लासवन दर्जाचे अधिकारी बसलेले होते.तर काही उद्योजक आणि समाजसेवक ही होते.एका मोठ्या कार्यक्रमाच्या संदर्भात आमचं बोलण सुरु झालेलंच होतं. आणि तेवढ्यात माझा फोन व्हायब्रेट व्हायला लागला. फोन समोरच असल्यामुळे माझं लक्ष स्क्रिनवर गेलं. फोन माझ्या वडिलांचा होता.मी सर्वाना चेहऱ्याने खूणवून विनंती केली आणि फोन उचलला.आणि मी एकदम मोठ्या आवाजात म्हणलं “बोला अण्णा काय म्हणताय..”तर पलीकडून अण्णा म्हणले “कुठ हाईस..? “ मी म्हणलं, पुण्यात आहे. अण्णा जरा मीटिंग मध्ये आहे. अण्णा म्हणाले “ते असू दे, काय खाल्लास का बाबा पोटाला..? मी होय म्हणलं..अण्णांनी फोन ठेवला.. आमचं बोलणं पुन्हा सुरू झालं.. आणि लगेच पाच मिनिटांनी पुन्हा अण्णांचा फोन आला..मी पुन्हा सगळ्यांना थांबवलं आणि फोन घेतला…पलीकडून आण्णा म्हणाल...
बाप बाप असतो..
Article

बाप बाप असतो..

बाप बाप असतो..बाप गेला त्याला आज 8 वर्षे होतायत. कुठलाच शाश्वत उत्पन्नाचा आधार नसताना चौघा मुलांना शिकवण्याची किमया त्यानं केली.कोराटीच्या फोकापासून कणग्या, डाले, टोपले व ताटवे विणने हा त्याचा 'स्वयंरोजगार' होता. गावापासून दूर जंगलातून बाप कोराटीचा मोठा भारा डोक्यावर आणायचा तेव्हा त्याचा चेहरा आणि कपडे पूर्णपणे घामाने ओले झालेले असायचे. त्यानंतर बाप त्या फोकाना साळायचा, काटे काढायचा. नंतर त्यांना वाकवून, पिरगाळून कणग्या व डाले तयार करायचा. हे साळून वाळलेले शेंडे, कोराटीचे तुकडे माय जळतन म्हणून चुलीत टाकायची. टीनाचं 8 पत्राचं घर होतं आमचं. त्यातही काही फूटलेले. पाऊस सुरु झाला की आमची धांदल उडायची. घरातली भांडीकुंडी आम्ही गळणाऱ्या जागी ठेवायचो.प्रस्थापित कवींना पाऊस सुरु झाल्यावर भले प्रेयसीची आठवण येत असेल, मला मात्र त्या गळणाऱ्या टीनाची आठवण येते. त्या रात्री मायनं ओल्या जळतणावर धूर ...
बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!
Article

बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो ‘आभाळमाया’ झाला.!

बाप मात्र सगळीकडेच उपेक्षित राहिला तरीही तो 'आभाळमाया' झाला.!   वडिलांच्या अनेक गोष्टींचा राग यायचा.  आता 'त्या'च गोष्टी मी अगदी तितक्याच सहजतेने करतो! मग त्या काळातल्या संतापाची आठवण झाली की अपराधीपणाची भावना दाटून येते. आईच्या मायेचे गोडवे आयुष्यभर गायलेत मात्र वडिलांच्या मायेचे काय झाले? याचे उत्तर आता अलगद गवसते आहे.   जन्मभर आईची माया तिच्या कुशीत शिरून अनुभवलेली पण बाप मात्र घाबरूनच अनुभवलेला. धाक, दरारा, दडपण यात बाप विरत गेलेला आणि मी ही त्याच प्रतिमेत गुरफटत गेलेलो. खरं तर, आता कळतं की वडिलांची माया देखील आईसारखीच स्नेहार्द्र होती,  त्यातही कोमलता होती पण पाकळ्यात अडकलेला भुंगा जसा कोषात गुरफटून जातो तसं वडिलांचं झालेलं असतं.   गरजांच्या चौकटीत त्यांना कुटुंबव्यवस्थेनं असं काही चिणलंय की त्यांची दुसरी तसबीरच समोर येत नाही. गरजा पूर्ण करणारा निष्ठूर माणूस असं काहीसं भकास चित्र उभं ...