Monday, February 16

Tag: #बानो बुढी#मराठी कथा#मराठी साहित्य#विजय जयसिंगपुरे#गावातील कथा#प्रेरणादायी लेख#ग्रामीण कथा#गोधडी शिऊन देणारी बानो बुढी

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री
Article

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्री

बानो बुढी – आमच्या गावातील मायेची गोधडी शिऊन देणारी स्त्रीआमच्या छोट्याशा गावात साऱ्या जातीधर्माची लोकं अगदी गुण्यागोविंदाने रहायची.गावात दहावी पर्यंत शाळा.पाच पन्नास कुणबी,पाटलांची,दहा बारा तेल्यांची ,पाच पंचवीस धनगर समाजाची वस्ती गावच्या नदीकाठावर बौद्धवाडा होता.बाकी गावगाडयाची जशीजशी लोकसंख्या वाढत गेली,तसतशी कुटूंबे मोठी झाली.काही नवीन प्लॉट पडलेल्या आखर पट्टीत शेणामातीची लिपून तर काही पक्की बांधून वस्ती करून रहायला गेली. दोनचार मुस्लिम समाजाची घरं होती. गफारभाई, व त्यांची भावडं पण गावाशी त्यांचा चांगला सलोखा होता. गफफारभाई हातात लोंखडी पाणा खांद्यावर घेऊन गावाला वॉटर सप्लाय म्हणजे नळ सोडायचे काम करायचे.दुसरा लहान भाऊ तालुक्याच्या बैलबाजारात गुरंढोर, बैलजोड्या विकण्याचा जोड धंदा करायचा. गावात अडल्या नडल्याले चांगली बैलजोडी विकत घेऊन द्यायचा.एक एसटी ड्रॉयव्हर असलेले त्यांच...