Sunday, October 26

Tag: बंजारा

पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम
Article

पोहरादेवी येथे ‘बंजारा विरासत’-नंगारा म्युझियम

पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियम* पोहरादेवी येथे 'बंजारा विरासत'-नंगारा म्युझियमचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा… * नंगारा म्युझियम विषयी सविस्तर माहिती * संत सेवालाल महाराजांची विख्यात भविष्यवाणी "मार पालेर खुटा मच रोपलीव'' _________________________________ आपण सर्वांना जय सेवालाल..🙏 दि. 03 डिसेंबर 2018 ला संत सेवालाल नंगारा वास्तू भूमिपूजन सोहळा प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने पार पडला. या ऐतिहासिक कार्यक्रमाची कायम नोंद लेखनीतुन व्हावी म्हणून "हुंमाळो नंगारारो" ही ISBN कृत स्मरणिका (Souvenir) संपादित करण्याचे भाग्य मला लाभले. श्री. तेजुसिंग पवार साहेब (अप्पर जिल्हाधिकारी) यांनी "नंगारा म्युझियम" अर्थात "संत सेवालाल सागर संग्रहालय " प्रकल्प अभ्यास अहवाल स्मरणिकेत प्रस्तुत केला. त्यातील उल्लेखनीय बाबी ह्या संपादित केलेल्या स्मरणिकेतील माहितीच्या आधारे बणजारा समुदायाची ऐतिहासिक व स...
बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 
Article

बंजारा भाषा, साहित्य व संस्कृती ऐतिहासिक ठेवा 

गोरबंजारा अकादमी : बंजारा भाषा, साहित्य, संस्कृतीसाठी ऐतिहासिक ठेवा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बंजारा समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असून बंजारा साहित्य, संस्कृती व कला ही भारतीय विविधतेला समृद्ध करणारी एक वैशिष्ट्यपूर्ण ठेवा आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात बंजारा लोकसाहित्य टिकून आहे. बंजारा भाषिकांची संख्याही राज्यात मोठयाप्रमाणात आहे. राज्यात सिंधी, ऊर्दू,  गुजराती अकादमी स्थापन केल्या गेली, परंतु बहुसंख्येने असलेल्या व समृद्ध लोकसाहित्य व संस्कृती असणाऱ्या बंजारा भाषिकांसाठी अकादमी नसल्याची वेदना प्रख्यात साहित्यिक एकनाथ पवार यांनी पुसद येथील एका बैठकीत बोलून दाखवली होती. त्यासाठी साहित्य संस्कृती क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक सभा आयोजित करण्याचे त्याचवेळी ठरविण्यात आले.  बंजारा साहित्य संस्कृती व कलेसाठी एक शाश्वत मंच असावे. भारतीय विविधतेत इतर भाषिकासह सुसंवाद साधत बं...
बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत
Article

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत

बंजारा अस्मिता जागविणारे भाषा गौरवगीत प्रत्येक जीवा जीवाची भावना, आचारविचार आदानप्रदान करण्याची एक शैली असते तिलाच आपण भाषा असे म्हणतो. प्रत्येक पशुपक्षी, प्राण्यांची सुध्दा एक भाषा असते. भलेही त्यांची भाषा आपल्याला कळत नसेल; परंतु त्यांची भाषा त्यांना मात्र कळते कारण त्याद्वारे ते त्यांचा जीवन व्यवहार व्यतित करित असतात. जगात मानव जात ही सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान गणल्या गेली; याचे कारण म्हणजे मानवाला निसर्गाने प्रदान केलेले बुध्दी चातुर्य होय. मानवाने आपली स्वतःची एक भाषा विकसित केली. त्या माध्यमातून तो विचारांची आदानप्रदान करायला लागला. जगात आज अनेक भाषा बोलल्या जातात. त्यापैकीच एक आगळीवेगळी, स्वतंत्र असलेली भाषा म्हणजे बंजारा समाजाची मातृभाषा होय. पुरातन काळापासून हा समाज आपल्या मायड भाषाला (मातृभाषा) आजतागायत जीवापाड जपत आला आहे. मग भलेही आजपर्यंत कित्येक स्थित्यंतरे झाली असत...
Article

मायबोली बंजारा भाषा आणि तिचा अभिजात वारसा

  बंजारा बोली ही बंजारा समाजाची मायबोली , मातृभाषा असून भारतभर बोलली जाणारी राजस्थानी प्रभाव असलेली इंडोआर्यन परिवारातील एक समृृद्ध बोली भाषा आहे. डॉ. हिरालाल शुक्ल यांनी बंजारा भाषेला 'इंडोआर्यन' परिवारातील भाषा म्हणून संबोधले आहे. तर डॉ. उदय नारायण तिवारी, डॉ. राहुल सांस्कृत्यायन यांनी बंजारा बोलीला 'राजस्थानी बोली' म्हटल्याचे आढळून येते. इतिहास संशोधक बळीराम पाटील यांच्या 'बंजारा क्षत्रियोका इतिहास' (१९३०) या ग्रंथातही बंजारा भाषेतील दोहे आलेले आहे. भारतीय विविधतेला संपन्न करणाऱ्या विविध मातृभाषा यापैकीच बंजारा ही एक समृद्ध वारसा जपणारी बंजारा समाजाची मातृभाषा होय. बंजारा भाषा संदर्भात प्रख्यात बंजारा भाषा, साहित्य आणि संस्कृतीचे अभ्यासक एकनाथ पवार-नायक यांनी "बंजारा भाषा ही ग्लोबल सिटीझनची चौदाखडी शिकवणारी एक सहिष्णूतेची मातृभाषा आहे. ज्यात कोणत्याही प्रकारची द्वेषमूलकता स्पर्शत नाही. ...