आता तरी ब्रेक घ्या…!
*आता तरी ब्रेक घ्या! ‘या’ पेक्षा जास्त वेळ फोनवर बोलण्याची चूक करू नका; उच्च रक्तदाबासाठी ठरू शकते कारण.....
आजच्या काळात मोबाइल फोन वापरणे ही अत्यंत सामान्य गोष्ट आहे. लहान मुलांपासून वयस्कर व्यक्तींपर्यंत प्रत्येक व्यक्तीच्या हातात आपल्याला मोबाइल दिसतो मग भले तो सुशिक्षित असो की अशिक्षित.आपण नेहमी पाहतो की आपल्या आसपास कित्येक लोक तासनतास मोबाइल फोनवर बोलत असतात पण त्यामुळे दीर्घकाळानंतर त्यांना गंभीर नुकसान होऊ शकते. मोबाइलच्या अतिवापरामुळे बऱ्याचदा असे म्हटले जाते की, ”मोबाइल ही गरज राहिलेली नसून व्यसन झाले आहे.” याचाच प्रत्यय देणारी माहिती सध्या एका संशोधनातून समोर आली आहे.
*जास्त वेळ मोबाइल फोन वापरण्यामुळे वाढू शकतो उच्च रक्तदाब विकसित होण्याचा धोका...
मोबाइलचा वापर करणे गरजेचे आहे पण त्याच्या अतिवापरामुळे आपल्या आरोग्यावर आणि आपल्या निरोगी जीवनशैलीवर खूप वाईट परिणाम होत आहे. न...
