प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!
प्रिय वरुण… वसुंधरेचं हृदयस्पर्शी पत्र; पावसाशी संवाद साधणारी धरणीमातेची कहाणी!प्रिय वरुण,मी आता इथे आयसीयुमध्ये असताना, श्वास कोंडत असताना, तुला पत्र लिहू कि नको, या विचारात असतानासुद्धा, शेवटी माझ्या मनातल्या भावना तुझ्यापर्यंत पोचवायच्या असतील तर दुसरा पर्याय नाही. या माझ्या लेखनाने तुला काही फरक पडेल कि नाही? माहित नाही. आणि तसेही मी तुला काही सांगत असताना तू कधी काही ऐकून घ्यायच्या मनःस्थितीत नसतो, तर कधी मला जमत नाही. कधी तू ऐकून न ऐकल्यासारखं करतो. पण असो.माझ्या प्रिया, मागच्या वर्षी तू दिवाळीत आला होतास. म्हणजे धावपळीत ओझरते दर्शन देऊन गेलास. पण अहाहा! काय रम्य दिवाळी होती ती. तुला बघून मी आणि माझी मुलं किती रे सुखावून गेली. तू आलास ना तर तुझ्या प्रेमळ स्पर्शाने आणि मायेने आम्हांला तसं फील होतंच. परत लवकरच येतो, असं सांगून तू गेलास, नाताळ संपून नवे वर्ष सुरु झाले. कडाक्याची...
