नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!
नगाराभवन : मनुवाद्यांची विरासत.!'बंजारा विरासत वस्तुसंग्रहालया'चे उद्घाटन झाले. भारताच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वोच्च पदावर असलेल्या बड्या मंडळींच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला. या समारंभाला येणाऱ्या पाहुण्यांचे राजकीय वजन आणि वलय पाहता गर्दी जमविणे आवश्यकच होते. त्यासाठी तांड्यांना लक्ष्य केले गेले. तांडे हे गर्दीचे एकमेव स्रोत होते. कार्यकर्ते जिद्दीला पेटले होते. नेत्याच्या प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा प्रश्न होता. त्याला गर्दीनेच उत्तर देता येणार होते. त्यामुळे कार्यकर्ते गर्दीसाठी आसूसले होते. रात्रंदिवस एक करून तांडे पालथे घालत होते. एकतर सोयाबीन काढण्यासाठी तांड्यात धावधूप सुरू होती आणि त्याचवेळी नगाराभवनचाही धामधूम सुरू होता. तांड्यांकडे वेळ नव्हता. उन्हापावसात राबराब राबून काळेठिक्कर पडलेल्या त्या थकल्याभागल्या लोकांपुढे सुंदर सुंदर स्वप्ने अंथरली गेली. पोह...

