Sunday, October 26

Tag: पोळा  

पोळा सण..काल,आज आणि उद्या
Article

पोळा सण..काल,आज आणि उद्या

पोळा सण..काल,आज आणि उद्या'पोळा, सण करी गोळा ' असे आपण म्हणतो ते खरेच आहे. सण ,उत्सव हे आपल्या संस्कृतीचे महत्त्वाचे अंग आहेत.आपले सर्व सण हे मराठी महिन्याच्या कोणत्या ना कोणत्या तरी तिथीला येत असतात. असा एकही महीना नाही की त्या महीन्यात कोणतातरी सण येत नाही. सर्व मराठी महीन्यात श्रावण महिना हा जास्त पवित्र समजला जातो. श्रावण महिण्याच्या अमावस्येला आपल्याकडे बैलांचा सण म्हणून ' पोळा ' साजरा केला जातो. भारतात हा सण सर्वत्र एकसारखा आणि एकाच दिवशी ,एकाच नावाने साजरा होत नाही. काही राज्यात याला पोंगल म्हणतात व तो वेगळ्या दिवशी साजरा होतो. महाराष्ट्रातही कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सिमा भागात वेगळ्या दिवशी आणि वेगळ्या पद्धतीने पोळा सण साजरा केला जातो. शेतीच्या हंगामानुसार हा सण आपापल्या भागात वेगवेगळ्या वैशिष्ट्य्यानुसार साजरा होतो.बालपण पुर्णपणे ग्रामीण भागात आणि शेतकरी कुटुंबात गेल्यामुळे ...