Saturday, November 22

Tag: पोतराज…

पोतराज…
Article

पोतराज…

पोतराजपोतराज हा मरीआई या ग्रामदेवतेचा उपासक. तो जातीने महार वा बहुधा मातंग असतो. पोतराज हा शब्द म्हणजे पोत्तुराजु या तमिळ शब्दाचे रूपांतर होय. शब्दाप्रमाणेच पोतराजाचे आचरण, पूजापद्धती, नृत्य इत्यादींवरही द्रविड संस्कृतीचा प्रभाव दिसतो. दक्षिणेत सात बहिणी या नावाच्या ग्रामदेवी प्रसिद्धआहेत. त्यांचा भाऊ असलेल्या एका ग्रामदेवाला पोत्तुराजु म्हणतात. मरीआईला लक्ष्मीआई असेही म्हणतात. त्यामुळेच पोतराजाला मरीआईवाला व लक्ष्मीआईवाला अशीही नावे आहेत.पोतराज व त्याचा परिवार गावात येतात, तेव्हा कडकलक्ष्मी आली असे म्हटले जाते. मरीआई ही कडक देवी असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी म्हणतात. पोतराजाच्या हातातील कोरड्याला ‘कडक’ असे नाव असल्यामुळे तिला कडकलक्ष्मी हे नाव मिळाले, असे सरोजिनी बाबर यांचे मत आहे. लक्ष्मी हा शब्द येथे विष्णुपत्नी या अर्थाने आलेला नसून, अंबाबाई या अर्थाने आला आहे.पोतराज पुरुष असूनही तो...