Friday, November 14

Tag: पुरुष

जागतिक पुरुष दिन…
Article

जागतिक पुरुष दिन…

 जागतिक पुरुष दिन...       खरं तर हा दिन असायलाच हवा.. जरी महिला दिनाइतका त्याचा उदोउदो झाला नाही तरीही प्रत्येक स्त्रीच्या मनात त्याच्या बद्दल आदर हा असायलाच हवा.. आईने आपल्या नवऱ्याचा आदर केला तर मुलगीही तिच्या नवऱ्याचा आदर करेल..  पुरूष वाईटच अशी कुठलीही वक्तव्ये मुलीसमोर करु नयेत नाहीतर लहानपणीच तिच्या मनात पुरुष वाईट ही संकल्पना बिंबवली जाते.. पुरूष वाईट असेल तर मग आपला  मुलगाही वाईटच.. आपला भाऊही वाईटच या सगळ्याचा सारासार विचार करुन आपण घरात किवा समाजात बोलावं..       मी लहानपणापासूनच पुरुषांमधेच वाढले , खेळले , बागडले.. आमच्या घरात पुरूषच पुरूष .. अगदी आजोबा बाबा काका भाऊ सगळेच मित्र.त्यांचे मित्र हेही माझे मित्र.. शाळेतही मित्र आणि कॉलेजमधेही मित्रच.. आणि आता तर मी रोज पुरुषांमधेच असते.. माझ्या आठवणीत एकाही पुरुषामुळे मला एकदाही कसलाही त्रास झाला नाही अगदी सोशल मिडीयावर सुध्दा ...